Skip to main content

ही माणस मरतायत तर मरू द्या

पर्यावरणवादी : पृथ्वीवर फक्त मनुष्य प्राण्याचा अधिकार नाही. मनुष्य सोडून इतर जीवांच्या सुरक्षिततेच काय ?? त्यांच्या असुरक्षिततेबरोबरच पृथ्वीची असुरक्षितता देखील वाढतेय. ध्यानात येत आहे का ??
 [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ]  
 अर्थतज्ञ : आर्थिक विकासाशिवाय आयुष्य कसे जगणार ? गरीबीत व उपासमारीत लोक युध्द करतील व विनाश होईल. हे चालणार का ?
 पर्यावरणवादी : विकासालाच मर्यादा शोधा मग. काय ?
 वैज्ञानिक : तुम्ही काळजी नका करू आम्ही यावरती पर्यायी उत्तर शोधत आहोत.
 पर्यावरणवादी ः जागतिक संकटातुन वाचवायचे असेल तर नियम कडक केले पाहीजे.
 सामान्य माणूस :  किती ते नियंमानी जगायच ?
 [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ] 
 पर्यावरणवादी ः आधीच केवढी ही लोकसंख्या. नैसर्गिक साधनांचा बेसुमार वापर यामुळे किती गहन प्रश्न निर्माण झाले याची कल्पना तरी करता येतेय का ?
 [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ] 
 सामान्य माणूस ः कस जगायच तुम्हीच सांगा. आम्हाला आमच कुटुंब पहीले सुरक्षित पाहीजे.
 अर्थतज्ञ : आणि विकास तर थांबवू नाही शकत ... आर्थिक गणित सोडवावीच लागणार
 पर्यावरणवादी ः म्हणजे आमच कोणीच ऐकणार नाही का ???
 [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ]   

Comments

Post a Comment