Skip to main content

सीमेवरची माणुसकीची प्रेते

कपिल: या ब्राम्हणांचा मला खून करावसा वाटतो. समाजातली सर्व संपत्ती हडप करून आता समानतेची भाषा करत आहेत ? त्यांच्या गल्लीतून गेलो तरी भिती वाटते रे..
संकेतः  तुला एवढा ब्राम्हण द्वेष का आहे रे? जातीयवाद उभा करायचा का? ए बाबा...जा नोकरी वगैरे काहीतरी कर, बेरोजगार झालाय तसा डोक्यात क्रांतिकारी विचार घुसायला लागले आहेत. ऊठ..
कपिल: तुला का रे एवढा ब्राम्हण पुळका?
संकेत: मला कोणाचाच पुळका नाही. तू तुझी जात धर्म वाचवण्यासाठी लढणार व ते त्यांची जात  धर्म वाचवण्यासाठी लढणार. फरक काय ? दोघेही एकमेकांच्या जागी बरोबर व दोघेही तेवढेच एकमेकांच्या जागी चूकीचे. आज त्यांच्याविरोधातली तूझी संख्या कमी म्हणून तू लढणार उद्या तुझी संख्या त्यांच्याविरोधातली जास्त म्हणून ते लढणार. सांग ना, फरक काय? जात धर्म...तू तरी कटाक्षपणे पाळतोस का रे  ? हे जात धर्म खर तर आपल्या हातातल 'साधन' आहे आपले आर्थिक , सामाजिक व राजकीय हक्क मिळवण्यासाठी ? त्यातून होणार्या मानवीहिंसाचारातून समाजिक सीमा धोक्यात येतात.

Comments