एक कॉल सेंटर मधल्या दोन मुलींचा संवाद प्रिया ः कधी लाॕकडाऊन संपणार ...घरी जायचे आहे... आपले गावच बरे..मी गावातच नोकरी बघेल. नाहीतर लग्न करून मोकळी होईल. असे ही पप्पा कधी पासून मागे लागले आहेत. उगच नोकरीसाठी स्थलांतर केले. डॉली : अगं, स्थलांतर आपण उगच हौस म्हणून करतो का ? नोकरिसाठी, शिक्षणासाठी, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपण स्थलांतर करतो. काही लोक शहरात नोकरी कायम रहावी, म्हणून शहरातच लग्न करून कायमस्वरूपी स्थायिक होतात. कोणालाही चांगल्या सुविधा, सुरक्षा, गुणवत्ता असलेल पारंपारिक सोबत आधुनिक शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, चांगले उत्पन्नाचे साधन हवेच असते. आणि यासाठी स्थलांतर कायम होत राहणार. हुशारी जगाच्या कानाकोपर्यातून शोधून काढतात. सांग स्थलांतर कसे थांबेल ? प्रिया ः ते आहे ग पण... डाॕली ः हे बघ, तुला मराठी येते मला इंग्रजी येते. आपल्याला ही दोन्ही भाषा उत्तम येते म्हणूनच तर आपण केरळ च्या काॕल सेंटर मध्ये चांगल्या पगारावर आहोत. नाहीतर आपल्या आपल्या राज्यात आपण असे किती कमवले असते ? प्रिया ः किती चांगले झाले असते जर स्थलांतरच नसते तर... डाॕली ः स्थल...
भारतः आम्ही स्वदेशी चळवळ पुन्हा उभारणार. आता सीमांवरून नाही म्हणून व्यवसायात घुसुन आमची आर्थिक व्यवस्थेवर कब्जा करणारे तुम्ही चोरटे घुसखोर...तुम्हाला ही घुसखोरी करू देणार नाही. अभिमान आहे स्वदेशी गोष्टींचा. इथुनपुढे फक्त स्वदेशी..फक्त स्वदेशी. स्वदेशी हा परमेश्वराचा... आईः ए चुप..काय चाल्लय आरशासमोर? आंघोळीला जा. गरम पाणी काढून ठेवले आहे. थंड होईल. भारतः अग आई गप गं, माझ्यात आत्ता टिळक संचारलेत... आईः थोड्यावेळाने जस्टीन बीबर पण संचारेल भारतः तुला ना तुझ्या मुलाचे काही कौतुकच नाही. ती पांड्याची आई बघ. कुठेही गेली तरी स्वतःच्या मुलाचेच गुणगान गात असते. आणि तू.. आईः काय गुणगान गाऊ तुझ ? नाव भारत पण आवड चायनीज फुड, इटालियन फुड कधी झुणका भाकर आवाडीने खाल्लास? आपल्याला भारतीय दिग्गज गायकांची नावे तरी सांगता येतील का ? कामाला लागलास...ते पण कुठल्यातरी परदेशी कंपनीत. नाव भारत पण भारतासाठी काय करतोस ? नुसताच लोकसंख्येत भर आणि बाकीच्यांची अडचण करून ठेवलीस... भारतः ए आई, उगच इतक क्रांतीकारक व्हायची गरज नाही. आणि मुळातच संगीत, अन्न, स...