भारतः आम्ही स्वदेशी चळवळ पुन्हा उभारणार. आता सीमांवरून नाही म्हणून व्यवसायात घुसुन आमची आर्थिक व्यवस्थेवर कब्जा करणारे तुम्ही चोरटे घुसखोर...तुम्हाला ही घुसखोरी करू देणार नाही. अभिमान आहे स्वदेशी गोष्टींचा. इथुनपुढे फक्त स्वदेशी..फक्त स्वदेशी. स्वदेशी हा परमेश्वराचा...
आईः ए चुप..काय चाल्लय आरशासमोर? आंघोळीला जा. गरम पाणी काढून ठेवले आहे. थंड होईल.
भारतः अग आई गप गं, माझ्यात आत्ता टिळक संचारलेत...
आईः थोड्यावेळाने जस्टीन बीबर पण संचारेल
भारतः तुला ना तुझ्या मुलाचे काही कौतुकच नाही. ती पांड्याची आई बघ. कुठेही गेली तरी स्वतःच्या मुलाचेच गुणगान गात असते. आणि तू..
आईः काय गुणगान गाऊ तुझ ? नाव भारत पण आवड चायनीज फुड, इटालियन फुड कधी झुणका भाकर आवाडीने खाल्लास? आपल्याला भारतीय दिग्गज गायकांची नावे तरी सांगता येतील का ? कामाला लागलास...ते पण कुठल्यातरी परदेशी कंपनीत. नाव भारत पण भारतासाठी काय करतोस ? नुसताच लोकसंख्येत भर आणि बाकीच्यांची अडचण करून ठेवलीस...
भारतः ए आई, उगच इतक क्रांतीकारक व्हायची गरज नाही. आणि मुळातच संगीत, अन्न, संस्कृती, कला, व्यवसाय उद्योग यांना कसली सीमा नसते गं. त्यात जर गुणवत्ता व नफा असेल तर ती भौतिक सीमा पार करूच शकते. माणुस आपला वेळ व पैसा तिथेच खर्च करतो किंवा तिथेच गुंतवतो जिथे गुणवत्ता व नफा आहे. असही आपल्याला दर्जा लागतो.
आईः पण म्हणून गुणवत्ता व नफ्यासाठी लाचार व्हाव ? स्वदेशी मालाची लाज वाटावी ? जेवढ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करतो तेवढ्याच उत्साहात भारतीय सण का नाही ?
भारतः इथे लाचारीचा काय संबंध आला ? तुला माहीतीय का... आपण कोणीच स्वयंपूर्ण नसतो. talents & natural resources are unevenly distributed. आणि म्हणूनच आपल्याला एकमेकांवर अवलंबून राहण गरजेच राहत कारण त्यात आपला देखील फायदा असतोच. Space पासून गावातल्या कुठाल्यातरी टपरीवर मिळणार्या चाॕकलेट पर्यंत तुला कुठेच सगळ 100% स्वदेशी दिसणार नाही. कोणी काय निवडावे यावर तु बंधन नाही आणू शकत.
आईः मग स्वदेशी मालात गुणवत्ता, दर्जा व नफा कसा आणता येईल हे बघ. आपल्या देशातल्या talents चा वापर आपल्या देशासाठी करून बघ. मला भारताला स्वतः च्या बळावर महासत्ता होताना पहायचे आहे. आहे का ही धमक ? घेशील का आव्हान ?
Comments
Post a Comment