Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

ही माणस मरतायत तर मरू द्या

पर्यावरणवादी : पृथ्वीवर फक्त मनुष्य प्राण्याचा अधिकार नाही. मनुष्य सोडून इतर जीवांच्या सुरक्षिततेच काय ?? त्यांच्या असुरक्षिततेबरोबरच पृथ्वीची असुरक्षितता देखील वाढतेय. ध्यानात येत आहे का ??  [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ]     अर्थतज्ञ : आर्थिक विकासाशिवाय आयुष्य कसे जगणार ? गरीबीत व उपासमारीत लोक युध्द करतील व विनाश होईल. हे चालणार का ?   पर्यावरणवादी : विकासालाच मर्यादा शोधा मग. काय ?   वैज्ञानिक : तुम्ही काळजी नका करू आम्ही यावरती पर्यायी उत्तर शोधत आहोत.   पर्यावरणवादी  ः जागतिक संकटातुन वाचवायचे असेल तर नियम कडक केले पाहीजे.   सामान्य माणूस :  किती ते नियंमानी जगायच ?  [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ]    पर्यावरणवादी  ः आधीच केवढी ही लोकसंख्या. नैसर्गिक साधनांचा बेसुमार वापर यामुळे किती गहन प्रश्न निर्माण झाले याची कल्पना तरी करता येतेय का ?  [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ]  ...

राजकीय शास्रज्ञांच्या गप्पागोष्टी

मिल  ः शासनाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे व्यक्तीस्वातंत्राचा संकोच होईल असे मला वाटते. कधी कधी लोकशाही म्हणजे  'बहुसंख्यांकाची हुकुमशाही' असा प्रत्यय येतो. कांट : ए भावा, समाज आणि राज्यातील सर्व कायदे हे प्रज्ञावंत मानवाने परस्परांत करार करून निर्माण केलेले असतात. बनावट किंवा अंधश्रध्दा यांच्या आधारावर दिलेल्या आज्ञा नसतात. लाॕक  ः हमम.. मी कायद्याचे अधिराज्य मानतो. तसेच जनमताचा पाठिंबा हा राज्याचा मुलाधार आहे. अॕरिस्टोटल  ः व्यक्तीविकास हा केवळ राज्यातच शक्य आहे आणि यासाठी राज्य आणि शासन या व्यवस्था सुधारलेल्या पाहीजेत.  मुळात माणसाचा स्थायीभाव हा त्याचा स्वार्थ असल्याचे दिसून येतो. रूसो  ः निसर्गाकडे चला..निसर्गाकडे चला... हाॕब्ज ः ए रुसो...शांत हो जरा. मॕकियाव्हेली बरोबर बोलला. मॕकियाव्हेली  ः end  justify the means महात्मा गांधी  ः काय संबंध, moral means for moral ends अॕरिस्टोटल  ः अतिरेकी स्वातंत्र्य मान्य नाही. बेंथम :  पण म्हणून मी कायद्याकडे शिक्षेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. तर गुन्हेगार कसा सुधारेल या अप...

सीमेवरची माणुसकीची प्रेते

कपिल : या ब्राम्हणांचा मला खून करावसा वाटतो. समाजातली सर्व संपत्ती हडप करून आता समानतेची भाषा करत आहेत ? त्यांच्या गल्लीतून गेलो तरी भिती वाटते रे.. संकेतः   तुला एवढा ब्राम्हण द्वेष का आहे रे? जातीयवाद उभा करायचा का? ए बाबा...जा नोकरी वगैरे काहीतरी कर, बेरोजगार झालाय तसा डोक्यात क्रांतिकारी विचार घुसायला लागले आहेत. ऊठ.. कपिल : तुला का रे एवढा ब्राम्हण पुळका? संकेत : मला कोणाचाच पुळका नाही. तू तुझी जात धर्म वाचवण्यासाठी लढणार व ते त्यांची जात  धर्म वाचवण्यासाठी लढणार. फरक काय ? दोघेही एकमेकांच्या जागी बरोबर व दोघेही तेवढेच एकमेकांच्या जागी चूकीचे. आज त्यांच्याविरोधातली तूझी संख्या कमी म्हणून तू लढणार उद्या तुझी संख्या त्यांच्याविरोधातली जास्त म्हणून ते लढणार. सांग ना, फरक काय? जात धर्म...तू तरी कटाक्षपणे पाळतोस का रे  ? हे जात धर्म खर तर आपल्या हातातल 'साधन' आहे आपले आर्थिक , सामाजिक व राजकीय हक्क मिळवण्यासाठी ? त्यातून होणार्या मानवीहिंसाचारातून समाजिक सीमा धोक्यात येतात.